The news is by your side.

जिल्हयात आज ९१कोरोना रुग्णांचा डिस्चार्ज एका रुग्णाचा मृत्यू

24
  • कोराना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के

प्रतिनिधी/ भंडारा।१८ नोव्हेंबर
: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे होणाNया रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. रूग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के झाला असून रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ९४ दिवसावर पोहचले आहे. जिल्हयात आज ९१ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून ४५ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला. आज ३९० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ४५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत ७८ हजार ५२४ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात ९६०२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील १५, मोहाडी ०५, तुमसर ०४, पवनी ०१, लाखनी ०६, साकोली ०८ व लाखांदुर तालुक्यातील ०६ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत ८७३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ९६०२ झाली असून ६३७ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या ०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण २३४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९२ टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर ०२.४३ टक्के एवढा आहे.शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणा-या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.