The news is by your side.

अखेर त्या हत्याचा आरोपी गवसला

17
  • स्थागुशा व ज . नगर पोलीसांची संयुक्त कामगीरी

प्रतिनिधी, भंडारा 17 नोव्हेंबर : सणावर कुख्यात गुंड नामे सुधाकर रामटेके रा . शहापुर ह्याची धारदार शस्त्रानी निघृण हत्या करण्यात आली होती . मृतक हा नागपुर जेल मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता . परंतु कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव झाल्याने तो रजेवर आला व शहापुर येथे पान टपरी चालवत होता . दरम्यान तो शहापुरात दहशत पसरवीत होता . एके दिवशी आरोपी नामे सोनीक अरुण मेश्राम वय १ ९ वर्ष रा . गोपेवाडा याच्या सोबत शुल्लक कारणावरुन भांडण झाले त्यात मृतक याने सोनीक व त्याच्या कुटुंबाला जिवानी मारण्याची धमकी दिली होती . याच कारणावरुन सोनीक ने त्याचा चुलत भाऊ अभिषेक प्रमोद मेश्राम वय २१ वर्ष रा . शहापुर याच्या मदतीने प्रथम दिनांक २३/१०/२०२० च्या रात्री जिवानीशी ठार करण्याचा कट रचला परंतु मृतक हा आपल्या पानटपरीवर हजर नव्हता . त्यानंतर दिनांक २५/१०/२०२० च्या पहाटे ०१:३० वा . दरम्यान मृतक सोबत त्याच्याच पानटपरीवर नशा केली . त्यानंतर घरी जाण्याच्या बहाण्याने सोनीक व अभिषेक हे निघाले परंतु घरी न जाता मृतकवर अंधारात दबा धरुन लक्ष ठेवून होते , अंदाजे ०२:३० वा . दरम्यान मृतक हा त्याच्या पानटपरीवर एकटा नशेत धुंद होऊन झोपला असल्याचे दिसताच दोन्ही आरोपी त्याच्या जवळ जावुन काका दारु प्यायला चला असे म्हणुन त्यास दुचाकी वाहनावर मध्ये बसवून गोपेवाडा च्या नहराच्या बाजुला घटनास्थळावर घेवुन गेले . त्यास आणखी दारु पाजली व नशेत बेधुंद करुन प्रथम त्यावर अभिषेक याने पोटावर सपासप दोन वार केले त्यामुळे मृतक खाली पडला त्यानंतर सोनीक याने त्याच शस्त्राने मृतकच्या मानेवर उजव्या बाजुला सपासप तिन बार केले व त्याचा खात्मा केला . तो मृत झाला याची खात्री करुन तेथुन पळ काढला . मा . पोलीस अधिक्षक सा . भंडारा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ घटनास्थळास भेटे देवुन स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व स्थानिक पोलीस स्टेशन चे चार तपास पथके नेमली त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन गुन्ह्यासंबंधी मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले . सदर गुन्ह्यात सतत २२ दिवस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणने कामी स्वतः तांत्रीक दृष्ट्या विश्लेषन करुन अहोरात्र गोपनीय माहिती काढुन संशयीत इसमांची पडताळणी केली त्यावरुन दिनांक १६/११/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा सोनीक मेश्राम व त्याचा चुलत भाऊ अभिषेक मेश्राम यांनी केला असल्याचे कळले . यावरुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता मृतकाचा खुन दोन्ही आरोपींनी केल्याची कबुली दिली व गुन्ह्यातील धारदार शस्त्राची विल्हेवाट लावल्याचे सांगीतले . सदरची कामगीरी ही मा . जिल्हा पोलीस अधिक्षक श्री . वसंत जाधव , अपर पोलीस अधिक्षक श्री . अनिकेत भारती , उपवि.पो. अधि . श्री . तुकाराम काटे सा . यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पो . नि . श्री . जयवंत चव्हाण , व त्यांचे अधिनस्त पथक सपोनि नारायण तुरकुंडे , पोउपनि सुनिल व्ही . उईके , पोहवा तुळशिदास मोहरकर , नापोशी प्रदिप डहारे , किशोर मेश्राम , अमोल खराबे , पोशि शेलश बेदुरकर , ईश्वरदत्ता मडावी , पंकज भित्रे , सचिन देशमुख तसेच पोस्टे जवाहरनगर चे ठाणेदार सपोनी श्री . एस . के . बारसे , व पोलीस स्टाफ पोहवा मिलाद जनबंधु , पोना बलीराम उईके , पोशि दुर्गाप्रसाद वैरागडे , संदीप बंबावले , योगेश घाटोळे अनी उत्तमरित्या पार पाडली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.